(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गुरुवारी १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून “बेटी बचाव बेटी पढाव”मोहिमे अंतर्गत शालेय मुलींसाठी प्रोत्साहन पर निधी गणपतीपुळे येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने देण्यात आला. या प्रोत्साहन पर निधीच्या धनादेशाचे वितरण बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे शाखेचे मुख्य व्यवस्थापक श्री. अमेय काजळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
यावेळी बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे शाखेचे श्री. अतुल कुमरे तसेच चाफे गावचे रहिवासी आणि बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे शाखेचे कर्मचारी जितेंद्र चाफेकर यांचेसह अन्य सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तसेच याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती करंबेळकर मॅडम यांचेसह सहशिक्षक पाटीलसर, काळम मॅडम, गावडे मॅडम आदींसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र गोवळकर आणि गजानन रहाटे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
गणपतीपुळे येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या प्रोत्साहन पर निधीचे धनादेश स्वरूपात वितरण केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती चाफे तसेच सर्व पालक व ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीने बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे शाखेचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.