(खेड)
दि. १४ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तसेच दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नाम.श्री.योगेशदादा कदम.यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या एसटी बसेसचे लोकार्पण खेड आगारात करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.शशिकांत चव्हाण तालुका प्रमुख श्री.सचिन धाडवे. दापोली तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी श्री.उन्मेष राजे, श्री.किशोरभाई देसाई आदि अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. तसेच खेड आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. रणजित राजेशिर्के तथा इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच कोकण एसटी प्रेमी ग्रुप, महाराष्ट्र राज्यचे प्रतिनिधीत्व म्हणून ग्रुपचे जनसंपर्क प्रमुख साहिल हुंबरे व सदस्य योगेश डेरवणकर उपस्थित होते.
आई श्री देवी काळकाई मंदिर येथे जाऊन सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कोकण एसटी प्रेमी सदस्यांनी नवीन बस साठी देवीस श्रीफळ अर्पण केला आणि प्रवाशांचा सेवेत नवीन गाड्या दाखल केल्या.