(रत्नागिरी)
दिनांक 24 मार्च रोजी एस आर के तायक्वांदो संस्थेची निवडणूक रत्नागिरी येथे पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी–अमोल रमेश सावंत, उपाध्यक्षपदी–वीरेश प्रभाकर मयेकर, सचिवपदी–शितल मधुकर खामकर, कोषाध्यक्षपदी–अंजली अमोल सावंत तर सदस्यपदी–निखिल नंदकुमार सावंत, प्रफुल्ल चंद्रकांत हातिसकर, शाहरुख निसार शेख यांची बिनविरोध निवड झाली असून या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण व्यंकटराव कररा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत, प्रशांत मकवाना यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.