(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर कदाचित महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या शाळांपैकी एक शाळा म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठेच्या मुख्य ठिकाणी असलेली जि.प. आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं १ आहे. १८५१ साली स्थापन झालेल्या या शाळेचे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ हे १७५ वे वर्ष आहे.
या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शाळेच्या इमारतीची कामे व डागडुजी संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष केळकर व सहकारी यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत नामदार उदय सामंत यांना शाळेच्या कामकाजासंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनाप्रसंगी मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ सदर कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले व संबंधितांना तसे निर्देश दिले.
यावेळी मालगुंड जीवन शिक्षण शाळा नंबर एक च्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विशाल लिंगायत, गिरीश बापट व दिनेश सुर्वे उपस्थित होते. यावेळी मालगुंड येथील सामाजिक कार्यकर्ते राजू साळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या निवेदनाच्या भेटी प्रसंगी नामदार उदय सामंत यांचे मालगुंड जीवन शिक्षण शाळा नंबर एक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष केळकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सलमान पूर्वक स्वागत करण्यात आले. त्यानंतर या भेटीत नामदार उदय सामंत यांना शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शाळेच्या कामकाजासंदर्भात आणि शाळेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. यावेळी शाळेच्या दैदीप्यमान वाटचाली बाबत नामदार उदय सामंत यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. त्यानंतर शाळेच्या कामकाजात संदर्भात निधी मंजूर करण्याचे आश्वासन संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नामदार उदय सामंत यांनी दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष केळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
फोटो: मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळा नंबर एकच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पालकमंत्री ना. उदय सामंत यांना निवेदन देताना समितीचे अध्यक्ष संतोष केळकर व त्यांचे सहकारी