(चिपळूण)
चिपळूणचे शहराचे ग्रामदैवत श्रध्दास्थान श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिमगा महोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण धार्मिक वातावरणात व शाही इतमामात फाल्गुन पौर्णिमा गुरुवार दि. १३ मार्च ते फाल्गुन कृष्ण सप्तमी शुक्रवार दि. २१ मार्च रोजी दुपारपर्यन्त साजरा होत आहे. अखिल महाराष्ट्रात सुप्रसिध्द व वैशिष्टयपूर्ण सणापैकी चिपळुणातील शिमगा उत्सवातील प्रमुख उत्सवमूर्ती श्री देव जुना कालभैरव -श्री देवी जोगेश्वरी, श्री देव केदार – श्री देवी जाखमाता यांच्या चतु:सिमा पालखी मिरवणुकीचा यंदाचा नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
श्रींचे चतुःसिमा पालखी मिरवणूकीचा नियोजित कार्यक्रम
गुरुवार दि.१३ मार्च रात्रौ ९ वा. लावणी कार्यक्रम* श्री दत्तमाऊली मुंबई निर्मित अजय जाधव प्रस्तुत अस्सल मराठमोळ्या लावण्यांचा घरंदाज नजराणा रंगला फड लावणीचा हा कार्यक्रम होईल.स्थळ : श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट अंतर्गत दै. सागर रंगमंच
गुरुवार दि. १३ मार्च रात्रौ १२.३० वा. : होळी पूजा व होम प्रज्वलन (होळीत अग्निदेवतेस श्रीफळ भाविकपणे अर्पण करावे. कृपया फेकू नये.)
गुरुवार दि. १३ मार्च रात्रौ १२.३५ वा. विघ्नहर्ता ग्रुप प्रस्तुत पुणेरी ढोल ताशा पथक आणि विविधांगी मनोरंजनाचे अनोखे सादरीकरण स्थळ : श्री ग्रामदेव जुना कालभैरव मंदिर पटांगण
गुरुवार दि. १३ मार्च, शुक्रवार दि.१४ मार्च, शनिवार दि.१५ मार्च र्श्रीं ची सहाण भरणे, श्री देवी भवानी भेट सीमा व धुळवट
गुरुवार दि. १३ मार्च रात्रौ रोजी १.३० वा. ‘श्रीं’ ची सहाण भरणे धार्मिक विधीनंतर रात्रौ २ वा. सहाणेवरून श्रींच्या पालख्यांचे प्रस्थान, रात्रौ २ वा. श्री. प्रकाश महाडीक यांची आरती स्वीकारून ब्राह्मणआळीत श्री नवाकालभैरव मंदिर परिसर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसर, राऊतआळी श्री गणेश मंदिर परिसर आरत्या घेत शुक्रवार दि.१४ मार्च रोजी सकाळी अंदाजे ६ वा. कै. अप्पा शेट्ये चौक श्री समर्थ कृपा अपार्टमेंट, येथे सोनारआळीतील आरत्या घेऊन श्री केदार मंदिर, शेट्येआळी, श्रीराम मंदिर, वैश्यवसाहतमध्ये कै. रामचंद्र महादेव शेट्ये यांच्या घरी पारंपारिक गादीवर बसेल. तेथून श्री मुरलीधर मंदिर मार्गे अण्णाभाऊ साठे नगर, साळीवाडा (निमकर वसाहत) कुंभारवाडी (चाफेचौक) मार्गे श्री देवी भवानी मंदिर (श्री क्षेत्र गांधारेश्वर) येथे भेट घेऊन खालची भोईवाडी, वरची भोईवाडीत (श्री साई मंदिर) मार्गे शनिवार दि. १५ मार्च रोजी सकाळी अंदाजे ६ वा. शंकरवाडीमध्ये आरत्या स्वीकारून शंकरवाडी तिठ्यावर त्यानंतर श्री देव मारूती मंदिर (शंकरवाडी), नवीन वसाहत, श्री रामेश्वर मंदिर (रामतीर्थ चौक), पवार बंधू, मारवाडी वसाहत, वेस मारूती चौक ते संभाजी चौक तेथून थेट खंडझोडे मंडळी (परत फिरून) ते संभाजी चौक मार्गे सावर्डेकर घरापर्यंत तेथून मार्कन्डेय वसाहतीत आतील भाग जांभळे घरापर्यंत आरत्या घेऊन लौकिक अपार्टमेंट, श्री. उदय मिर्लेकर घर ते श्री स्वामी समर्थ मठापर्यंत अंदाजे रात्रौ ११ वाजेपर्यंत आरत्या घेईल. (श्री भवानी भेट सीमा समाप्ती)
शुक्रवार दि. १४ मार्च रोजी सकाळी चतुःसिमा धुळवट होईल.
शनिवार दि. १५ मार्च, रविवार दि.१६ मार्च, सोमवार दि. १७ मार्च श्री देवी विंध्यवासिनी भेट सीमा व शेणवट
शनिवार दि.१५ मार्च रोजी रात्रौ अंदाजे ११:३० वा. कराडरोड (स्व. बापूसो खेडेकर मार्ग) देवधर हॉस्पिटल समोरील नाटुस्कर घरापासून श्री पंचमुखी हनुमान मंदिर, डॉ. साने हॉस्पिटल/ऑर्चिड, शिवशक्ती आतील वसाहत, चिपळूणकर/सावर्डेकर मंडळी, परांजपे हॉटेल ते परांजपे स्किम मंडपात रविवार दि.१६ मार्च रोजी सकाळी अंदाजे ७ वा. जाईल. तेथून परत फिरून बांदल हायस्कूल/पूर्व भाग सोसायटी, जिव्हाळा मार्ट, श्री. सुरेशशेठ चिपळूणकर यांच्या घरापर्यंत तेथून भागडेवाडीत, वडार कॉलनी श्री मारूती मंदिर (गांधीनगर) तेथून बाळकृष्णनगर, कुंभारवाडा, बहादूरशेख नाका तेथून श्री दत्त मंदिर (खेर्डी) भेट घेऊन परत फिरुन एव्हरशाईन अपार्टमेंट, राधाकृष्णनगर मंडपात सभोवतालच्या आरत्या स्वीकारून मेहता पेट्रोल पंप (हायवे) विंध्यवासिनी पाटी हिंदू कॉलनी रावतळेकडे, लक्ष्मीकृपा अपार्टमेंट/सोमेश्वर अपार्टमेंट यांच्या आरत्या स्वीकारून डॉ. दीक्षित घरापर्यंत आरत्या घेऊन परत फिरुन रावतळे मराठी शाळेजवळील आरत्या स्विकारून श्री देवी विंध्यवासिनी भेटीला श्रींची स्वारी जाईल. नंतर विंध्यवासिनी रोडने खाली येऊन मतेवाडी नवीन रस्त्याने मतेवाडी / गणेशवाडी ग्रामस्थ मंडळींच्या मंडपात सोमवार दि. १७ मार्च रोजी सकाळी अंदाजे ६ वाजता आरत्या स्वीकारून, देसाई हाईटस्, श्री साई मंदिर, हॉटेल साईली मार्गाने रेडीज पंपाचे बाजूने गोवा रोडने (एकमार्गी डाव्रा बाजूने दोन्ही बाजूच्या आरत्या घेत) पालकर बंधु सोनार डि.बी.जे. कॉलेज समोरून पहिली ओझरवाडी नंतर श्री शंकर मंदिर दुसरी ओझरवाडी आरत्या घेऊन शिवाजीनगर मधील आरत्या स्वीकारून श्रींची स्वारी थेट होळीला प्रदक्षिणा घालून दुपारी अंदाजे ३ वाजेपर्यंत बाजारपेठेकडे रवाना होईल. (श्री विंध्यवासिनी भेट सीमा समाप्ती)
शनिवार दि. १५ मार्च रोजी सकाळी चतुःसिमा शेणवट होईल.
सोमवार दि. १७ मार्च, मंगळवार दि. १८ मार्च खिंड, उक्ताड व बाजार चव्हाटा सीमा
सोमवार दि. १७ मार्च रोजी दुपारी अंदाजे ३ :३० वा. श्रींच्या चव्हाटा स्थळापासून श्री. माळी कुटुंबियांची आरती स्वीकारून भार्गव पेठ. श्री बाजार मारूती, प्रभातगल्ली बंदरपूलाकडे नाथ पै चौकातून गुहागर रोडवरून भेंडीनाक्यात लकेश्री घराकडून जिनगर आळीतून आरत्या घेऊन खेंड चौकीत ईच्छापूर्ती गणेश मंदिर मार्गे, म्हापुस्कर मारूती, रश्मी प्लाझा गृहसंकुल पर्यंतच्या आरत्या घेऊन श्रींची स्वारी थेट (आरत्या न घेता) उक्ताड येथे श्री. प्रकाश शिगवण घरापर्रंत जाईल. (मिरजोळी सीमेवर फक्त ढोल अब्दागीर जाईल) परत फिन आरत्या घेत कानसेवाडी तिठ्यावरून उक्ताडात श्री कालभैरव मंदिरात बसून नंतर गणेश मंदिराकडून खेंड चौकीत साईसदन (माडीत) बसेल. तेथून महाकाळ घरापासून भेंडीनाक्यातून खेंड-पांचमाडकर विठ्ठल मंदिराकडून मंगळवार दि. १८ मार्च रोजी अंदाजे सकाळी ६ वाजता हवेली, संसारे नाक्यातून भागवत, मेहंदळे, युनिटी /साहिल /गोवर्धन अपार्टमेंट चितळे वाडा परिसर परत फिरून हेलेकर मारूती मंदिराकडून पिंपळ गणेश मंदिरापर्यंत जाईल. तेथून परत फिरून वासुरकर श्री शंकर मंदिरपर्रंत जाईल.नंतर पटेल सॉ मिल पासून दुर्गाळीतून जुन्या एस.टी. स्टॅण्डच्या मागच्या बाजूने पोस्टाकडून छत्रे मारूती बाजारपेठ स्वामी कॉम्प्लेक्स पासून सरळ मेनरोडने गांधी चौकापर्यंत तेथून नाथ पै चौक मार्गे, मारवाडी आळी, पानगल्लीतून गांधी चौकात परत फिरून सायंकाळी अंदाजे ६ वाजता चव्हाटा व्यापारी अर्जाचा कार्यक्रम करून खरेदी-विक्री संघाकडून तांबोळी आळीत शिवनदी, सागावकर-कोवळे घरापासून गुरवआळी, श्री देवी एकवीरा मंदिर वडनाक्यापर्यंतच्या रात्रौ अंदाजे ११ वा. पर्यत आरत्या घेऊन श्रींची स्वारी पाग खिंड सीमेकडे रवाना होईल. (खिंड उक्ताड व बाजार चव्हाटा सीमा समाप्ती)
सोमवार दि. १७ मार्च रोजी रात्रौ ११ वाजता वैश्यवसाहतीमधील श्री देव केदार मंदिरातून विशेष आकर्षणासह ढोल, ताशे, सनई आदिंच्या वाद्यगजरात, विद्युत रोषणाईयुक्त अंबारीसह सुशोभित हत्तीची मिरवणूक निघून नंतर अंदाजे उक्ताड गणेश मंदिर येथे श्रींच्या पालखी मिरवणूकीत विलीन होईल.
मंगळवार दि. १८ मार्च, बुधवार दि. १९ मार्च पाग, खिंड सीमा (श्री महालक्ष्मी भेट सीमा)
मंगळवार दि. १८ मार्च रोजी रात्रौ अंदाजे ११ वा. वडनाक्यातून श्री. जानवलकर घरापासून शिवाजी चौक (चिंचनाका) कडे आरत्या घेत नंतर मनोहर हॉटेल लॉजपासून भोगाळ्याकडून मध्यवर्ती एस.टी.स्टँड, बुरूमतळी मार्गे मोडक चाळ, पोलीस लाईन, पॉवर हाऊस कॉलनी, दै. सागर इमारती जवळून पागेवर श्री. उदय चितळे (रायगड) बंगल्यापासून गोरिवलेवाडी, पाग जि.प. शाळा, श्री. देवकांत चिपळूणकर घरापर्यन्त जाऊन परत फिरून उघडा मारूती जवळील श्री. बामणे घरापर्यंत जाऊन परत फिरून उघडा मारूती समोरील आरत्या घेऊन रानडे आळीत गोपाळकृष्ण मंदिरात बुधवार दि. १९ मार्च रोजी अंदाजे सकाळी ६ वाजता भेट घेऊन विश्वकर्मा चौक मार्गे जोशी आळीत श्री कृष्णेश्वर मंदिर भेट घेऊन तेथून जाधव बंधू यांच्या घराकडे येऊन भगवा चौक मार्गे चितळे बंधू यांच्या भागिर्थी निवास पर्यन्त तेथून ताम्हाणे असोसिएटच्या कृष्णेश्वर नगर बिल्डिंगमधील रस्त्याने हायवेवर तेथून पाग माळ्यावरून कोल्हेखाजणमार्गे श्री महालक्ष्मी नगर, खेंड जाखमाता मंदिर मार्गे पिंपळ गणेश मंदिरापर्यंत जाऊन पोस्टाकडे आंबेडकर हॉलपासून मेनरोडने शिवाजी चौकापर्यन्त आरत्या घेऊन श्रींची स्वारी थेट मंदिराकडे गुरुवार दि. २० मार्च रोजी अंदाजे सकाळी ६ वा. पर्यंत येईल.( पाग खिंड सीमा महालक्ष्मी भेट सीमा समाप्ती)
बुधवार दि. १९ मार्च रंगपंचमी, रात्रौ चव्हाटा कार्यक्रम
सायंकाळी ५.३० वा. चतुःसिमा रंगपंचमी नंतर रात्रौ १० वा. चव्हाट्यावर मांड भरणे, व्यावसायिक व रयतेसाठी वार्षिक राखण करणेबद्दल ‘श्रीं’स साकडे (स्थळ जुनी खाटीक गल्ली) बाजारपेठ, चिपळूण.
गुरुवार दि. २० मार्च रोजी सकाळी अंदाजे ६ वाजता श्री देव कालभैरवाचे लळीत
गुरुवार दि. २० मार्च,शुक्रवार दि. २१ मार्च पाग झरी व पवार आळी सीमा
गुरुवार दि. २० मार्च रोजी सकाळी अंदाजे ७ वा. श्रींची स्वारी सहाणेवरून प्रस्थान करून वडनाक्यावर कै. अॅड. सुधीर चितळे घरापर्यंत जाऊन परत फिरून बापटआळी, जंगमआळी, कन्याशाळा, होळीवरून गौतमेश्वरनगर परिसर, आईस फॅक्टरी परिसर, देवधरनगर परिसर ते शिवाजी चौक येथील कै. सुधाकर टाकळे निवासस्थानापर्यन्त, त्यानंतर बुरूमतळी येथील श्री. धनंजय चितळे यांचे घराकडून श्रीराम औषधी भांडार, सैनिकी वसतीगृह मार्गे यादवचाळ, झरीवर तहसिलदार कार्यालय, साकेत गृहसंकूल, लटकेवाडी श्री साईमंदिर, श्री. चितळे घरापर्यंत जाऊन परत फिरून बी. जी. सोवनी असोसिएटच्या साईधाम गृहसंकूल पर्यत जाऊन कळकवणे ग्रामस्थ सभोवतालच्या आरत्या स्वीकारून हायवेवरून वीरेश्वर कॉलनीत वीरेश्वर मंदिर भेट घेऊन श्री. लिंगायत गुरव यांचे घरापासून सीता निवास पर्यंत तेथून हायवेने प्रभात रोड वरील रेकॉन प्लाझा व कै. श्रीराम भिडे घरापासून आरत्या घेत रॉयलनगरच्या गेटवर तेथून प्रभात रोडला बाळ परांजपे ( गुलमोहर ) येथे परत येऊन आवटी कुटुंबीय घरापर्रंतच्या आरत्या घेऊन कदम चाळीत नंतर जुनी वडार कॉलनीत तेथून थेट श्री नवाकालभैरव मंदिराजवळील स्वामी अपार्टमेंट पासून चितळे मंगल कार्यालयमार्गे गौरेश अपार्टमेंट, बेंदरकर आळी, औदुंबर अपार्टमेंट, सुभाष देवरूखकर घर, अश्विनी अपार्टमेंट परत फिरुन पवार-घोरपडे चाळ, देसाई एनक्लेव्ह शुक्रवार दि. २१ मार्च रोजी सकाळी अंदाजे ६ वा. केदार होळीवरून थेट भेंडे गल्लीत परत फिरून पवारआळी तिठा व श्रीराम मंदिरमार्गे केदार मंदिराकडे श्रींची स्वारी दुपारी अंदाजे १२ वा. पर्यंत सहाणेवर आसनस्थ होईल. (पाग झरी, पवारआळी सीमा समाप्ती)
गुरुवार दि. २०मार्च रोजी रात्रौ ११ वा. सुशांत शशिकांत प्रस्तुत अस्सल ठसकेबाज मराठमोळ्या लावण्याचा सदाबहार नृत्याविष्कार, लावण्याची खाण लावण्यवती अप्सरा (लावणी मिमिक्री नाटिका ) कार्यक्रम स्थळ : श्री केदारेश्वर मंदिर (वैश्यवसाहत), चिपळूण.
शुक्रवार दि. २१ मार्च श्री केदार लळीत कार्यक्रम
दुपारी १२ वा. श्री देव केदारेश्वराचे लळीताच्या कार्यक्रमाने शिमगोत्सव समाप्ती होईल.
भक्तगण नागरिकांना आवाहन
शिमगोत्सवात ज्या भक्तगणांना पालखी नवसाच्या नारळावर बसविणेची आहे त्यांनी कृपया विश्वस्त मंडळाशी संपर्क साधून पूर्वसूचना द्यावी. बाजारपेठ, मुबई गोवा हायवे व कराड रोड, भोगाळे, बुरूमतळी, बापटआळी येथे पालखी मिरवणूक नियोजित मार्गाने रस्त्याच्या डाव्या बाजूने मार्गक्रमण करणार असल्याने कृपया रस्त्याच्या उजव्या बाजूस राहणाऱ्या नागरिकानी डाव्या बाजूला आरती घेऊन पालखीच्या दोन्ही बाजूनी आरती करण्याची तसदी घ्यावी. उर्वरित प्रभागात पालखी रस्त्याच्या मध्यभागातूनच जाणार आहे. तरी नागरिकानी मध्यभागी येऊन पालखीच्या दोन्ही बाजूनी आरती करावी. शक्यतो कुटुब प्रमुखाने फक्त आरती करावी. तसेच नागरिकानी, भक्तगण यांनी आनदाने उत्साहाने शिमगा महोत्सवात आपापल्या विभागात सक्रिय सहभागी होऊन आवश्यक सहकार्य द्यावे. तसेच देवस्थान ट्रस्टच्या अधिकृत पावतीधारकाकडेच देणगी, वर्गणी जमा करावी. श्री जुना कालभैरव मंदिर जिर्णोद्धार संकल्प कामकाज प्रगतीपथावर असून अंतिम टप्प्यात आले आहे तरी भक्तगणानी सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामदेव श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूणतर्फे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. किशोर शेटये, श्री. समीर शेटये, महाजन विश्वस्त श्री. पंकज कोळवणकर (सचिव), सेवेकरी विश्वस्त श्री. सुमता शिदे, श्री. चद्रशेखर लाड आणि शिमगोत्सव समिती अध्यक्ष श्री.दिनेश श्रीकृष्ण देवळेकर यानी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये करण्यात येत आहे.