कुंभार्ली घाटात दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. या अपघातात विश्वजित जगदीश खेडेकर (वय 42) तर सुरेखा जगदीश खेडेकर (वय 65) यांचा मृत्यू झाला. विश्वजित खेडेकर हे आपल्या आईसोबत स्विफ्ट डिझायर कारने पुण्याहून कुंभार्ली येथील गावी येत होते. मात्र कुंभार्ली घाटात पोहोचले असता गाडी खोल दरीत कोसळून अपघात झाला. कार दरीत कोसळली, यात दोघांना जबर मार लागला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. कराड चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्री सुमारे २०० फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
अपघाताची ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास घडली. ते दोघेही घरी न आल्याने शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. या अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. विश्वजित जगदीश खेडेकर (वय ४२), सुरेखा जगदीश खेडेकर (६५, दोघेही रा.कुंभार्ली) अशी मृतांची नावे आहेत. विश्वजित व सुरेखा जगदीश खेडेकर हे दोघे महाशिवरात्री यात्रेसाठी कारने पुणे येथून गावी कुंभार्लीकडे येत होते. पाटण येथे रविवारी रात्री ८.३० वाजता जेवण आटोपून पुढील प्रवासाला निघाले. रात्री १० च्या सुमारास कुंभार्ली घाटातील पोलीस चौकीपासून कार पुढे निघून गेली मात्र चौकीपासून तिसऱ्या अवघड वळणावर सुमारे दोनशे फूट खोल दरीत कार कोसळली.
ज्या ठिकाणी ही कार कोसळली होती, त्याबद्दल कुणालाच माहित नव्हते. अखेरीस मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घ्यावा लागला, तेव्हा मायलेकाचे मृतदेह सापडले. विश्वजित खेडेकर आईसह रविवारी दुपारी पुण्याहून निघाल्यावर सातारा येथे आल्यानंतर पाच-सहाच्या सुमारास त्यांचा संपर्क झाला होता. मात्र, त्यानंतर ते रात्री घरी पोहोचलेच नाहीत. कुंभार्ली घाटात आल्यानंतर त्यांची मोटार सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळली.
खेडेकर कुटुंबीय विश्वजीत आणि सुरेखा खेडेकर यांची गावी नातेवाईकही वाट पाहत होते. पण दिवस उलटला तरी दोघेही घरी आले नाहीत. त्यांचा शोध सुरू केला. गेले दोन दिवस अपघाताची कोणालाच माहिती नव्हती. खेडेकर यांची पत्नी पतीच्या मोबाईलवर फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, कॉल रिसिव्ह केला जात नव्हता. अखेर मंगळवारी दुपारी खेडेकर यांचे नातेवाईक शिरगाव पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधले असता ते कुंभार्ली घाटात आढळले. घटनास्थळी जाऊन जेव्हा पाहणी केला असता खेडेकर यांची कार दरीत कोसळली होती. अपघाताला दोन दिवस उलटले होते. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला होता.
अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातानंतर कुंभार्ली गावातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विश्वजित खेडेकर यांच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या अपघातामुळे खेडेकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सदर अपघाताची नोंद अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. खेडेकर यांच्या मागे मुले, पत्नी, तीन भाऊ असा परिवार आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची तपशिलवार माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेडेकर यांच्या कारचा अपघात कसा झाला, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. खेडेकर कुटुंब काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांचे नातेवाईक आहेत. जगदीश खेडेकर यांच्या वडिलांचे ही सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यानंतर खेडेकर यांना पत्नी व मुलाच्या मृत्यूमुळे हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. विश्वजित खेडेकर हे पुणे येथे एका नामवंत कंपनीत नोकरीला होते. त्यांची पत्नी डॉक्टर असून ते पुणे येथेच वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दीड वर्षाची मुलगी असा परिवार आहे.