(रत्नागिरी)
आंबेशेत, र.न.प. शाळा क्र. १९ येथे सखी सावित्री उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत आरोग्य व स्वच्छता विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. (सौ.) श्रुती मुळ्ये यांनी विद्यार्थिनींना बदलत्या काळात घ्यावयाची काळजी, संतुलित आहाराचे महत्त्व तसेच मोबाईलचा अतिरेकी वापर टाळण्याचे महत्त्व पटवून सांगितले. यावेळी त्यांनी “चांगला स्पर्श – वाईट स्पर्श” या विषयावर जनजागृती करत विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाची जाणीव निर्माण केली.
डॉ. मुळ्ये या BHMS डॉक्टर व आहारतज्ञ असून, त्यांनी अलीकडेच निवखोल येथे आपले क्लिनिक सुरू केले आहे. भविष्यात अशा शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांतून योगदान देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापक श्री. कणमुसे तसेच मधे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.

