(रत्नागिरी)
रोटरी क्लब रत्नागिरी आणि इंटरॅक्ट क्लब ऑफ पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आकाश दर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि शुक्र, शनी, गुरु, मंगळ या चार ग्रहांचे तसेच चंद्राचे दुर्बीणीतून निरीक्षण करून आनंद घेतला. कार्यक्रमासाठी चार दुर्बिणी लावण्यात आल्या होत्या, आणि सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आकाश निरीक्षण केले.
हा कार्यक्रम खगोल अभ्यास केंद्र, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुप यांच्या सहकार्याने पार पडला. प्रारंभी प्रा. बाबासाहेब सुतार यांनी पॉवरपॉईंट द्वारे विश्वाच्या शोधात या विषयावर सुमारे अर्धा तास मनोरंजक व्याख्यान दिले. तसेच आकाशाकडे पाहण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी जेष्ठ खगोल अभ्यासक श्री. सुहास गुर्जर यांनी पालकांशी संवाद साधला आणि त्यांना आकाशामधील ताऱ्यांचे साम्राज्य बाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांची उपस्थिती हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय बनवून गेली.
कार्यक्रम प्रसंगी श्री. रूपेश पेडणेकर, अध्यक्ष, रोटरी क्लब रत्नागिरी,अॅड. मनीष नलावडे, सचिव, रोटरी क्लब रत्नागिरी, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री.राकेश चव्हाण सर, रोटरी चे निलेश मुळ्ये, इव्हेंट चेअर सुरेंद्र यारम, कु.झैनब लांबे, अध्यक्ष, इंटरॅक्ट क्लब, पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी, तसेच इंटरेक्ट क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुपचे श्री. कौस्तुभ पराडकर आणि त्यांचे सहकारी, तसेच श्री. विनयकुमार आजगेकर आणि श्री. सम्यक हातखंबेकर यांनी लहानग्याना दुर्बीणीतून ग्रहदर्शन घडवले
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी इंटरॅक्ट क्लब ऑफ पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांनी परिश्रम घेतले त्यांना पोदार इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक श्री.अमोल शिवलकर सर व आरवी पाटील मॅडम तसेच इतर शिक्षकवर्गानी मार्गदर्शन केले.