(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई आयोजित शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रा.भा.शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल १००% लागला आहे. या परीक्षेत ए श्रेणी मध्ये १० विद्यार्थी, बी श्रेणी मध्ये २९ विद्यार्थी आणि सी श्रेणीमध्ये २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तसेच इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल ९७.२६% लागला आहे. या परीक्षेत ए श्रेणीमध्ये २० विद्यार्थी, बी श्रेणीमध्ये १७ विद्यार्थी आणि सी श्रेणीमध्ये ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रशालेतील कलाशिक्षक उदय लिंगायत, गौरव पिलणकर आणि जीभाऊ चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी , प्रशालेच्या
प्र.मुख्याध्यापिका स्नेहा साखळकर, उपमुख्याध्यापक कुमारमंगलम कांबळे, पर्यवेक्षिका पुनम पवार आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.