(गणपतीपुळे / वैभव पवार)
वाचन पंधरवडा व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित “लेखक आपुल्या दारी” या उपक्रमांतर्गत कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा साहित्यिक अरूण मोर्ये यांनी मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालय चाफे येथे युवा वर्गाला संबोधित केले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, चांगलं लिहायचं असेल तर आधी चांगलं वाचायला हवं. वाचन चौफेर असावं, ज्ञान मिळवायचे असेल तर पुस्तकेच वाचावी लागतील. मोबाईलवरील वाचन माहितीसाठी, संदर्भासाठी करावे. मात्र आजच्या गतीमान युगात जाणिवपूर्वक शोधलं तर सकस लिखाण आंतरजाल प्रणालीवर ही उपलब्ध आहे.
यावेळी चाफे महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालयेमॅडम , प्रा. सुयोग मोहिरे सर व इतर मान्यवर आणि वरीष्ठ महाविद्यालयातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.