( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
श्री शिवाजी शिक्षण उत्तेजक मंडळ संचालित श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब येथे सन 1996 -97 एस.एस.सी बॅच स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोमवार दिनांक 20/02/2025 रोजी सकाळी कै. आप्पासाहेब जाधव सभागृहामध्ये सन 1996-97 च्या एस.एस.सी. बॅच चा मेळावा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे चेअरमन नामदेवराव जाधव, सचिव कु. प्रणित जाधव, संचालक श्री मंगेश जाधव, संस्थेचे पदाधिकारी श्री शिवाजी वामन जाधव, प्रतिष्ठित नागरिक श्री प्रभाकर वडके, श्री संजय जाधव उपस्थित होते. माजी शिक्षक श्री गायकवाड सर, त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.राऊत सर, शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
सन 1996-97या बॅचमधील बहुसंख्य माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. या बॅचमधील श्री राकेश जाधव एपीआय सध्या कार्यरत पुणे, श्री.अमित वारे श्री.अमित जाधव, श्री गिरीश जाधव, श्री.प्रदीप राव, श्रीकिरण वडके, श्री नटे, सचिन जाधव, व इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांचे शाब्दिक स्वागत झाल्यानंतर पुस्तक भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला.
ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारी शंभर पुस्तके श्री राकेश जाधव व त्यांचे सर्व सहकारी सर्वांनी मिळून संस्थेचे चेअरमन नामदेव जाधव यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्री. प्रदीप राव, श्री सुशांत जवळ यासारख्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेत घाववलेले ते क्षण शाळेतील शिक्षकांनी केलेले संस्कार या सर्व आठवणी अजूनही मनात तशाच टवटवीत आहेत. त्यानंतर श्री राकेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील शाळेतील शिक्षण व अत्यंत चांगले गुणवत्ता पूर्ण शिक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं यासारख्या शिक्षण बाहेर मिळत नाही असेही ते म्हणाले. शिक्षक शिकवत असताऩ आध्यापनकडे लक्ष असले पाहिजे. तणाव विरहित जगता आले पाहिजे. दृष्टिकोन सकारात्मक असेल तर नक्कीच आपल्याला मार्ग सापडतो असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना कुठली अडचण तरी सदैव पाठीशी उभे राहण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. त्या नंतर दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा प्रदर्शनीय मैत्रीपूर्ण सामना झाला.