(रत्नागिरी)
रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व रोटरी क्लब ऑफ बांदा यांचे वतीने रोटरी डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू क्रीडा स्पर्धा सावंतवाडी येथे घेण्यात आल्या होत्या, क्रिकेट स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी विजेतेपद पटकाविले. तसेच कॅरम,टेबलटेनिस,ऍथलेटिक्स या स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळवून मानाचा क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्लबचा चषक देखील रत्नागिरीने मिळवला. सावंतवाडी, वेंगुर्ला, बांदा, रत्नागिरी,मालवण मधील संघ सहभागी झाले होते. या स्पर्धांचे उद्घाटन सावंतवाडी राजघराण्याचे युवराज श्री लखमराजे भोसले, सावंतवाडी संस्थान यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
बक्षीस वितरण समारंभ मा.रो.रमेश तिवारी ( डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी – डायलेसीस, पिएचएस) असिस्टंट गव्हर्नर डॉ.विद्याधर तायशेटे, असिस्टंट गव्हर्नर रो.महादेव पाटकर, डिसिसी निलेश मुळये, राजेश घाटवळ डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी यांचा हस्ते संपन्न झाला. खेळविण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि वेंगुर्ला संघात अंतिम चुरशीची लढत झाली. या लढतीत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी १३ धावांनी विजय मिळवला.