(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथील बौद्धजन पंचायत समिती व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव कळझोंडी पंचशील बुद्धविहार येथे कळझोंडी शाखेचे अध्यक्ष आयु .अनिल पवार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी विचार मंचावर उपाध्यक्ष संदीप पवार, सेक्रेटरी सुभाष पवार, सभापती प्रकाश पवार, सल्लागार किशोर पवार, रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार तसेच महिला मंडळ अध्यक्ष नलिनी पवार, सभापती नम्रता पवार, सेक्रेटरी रीना पवार, ज्येष्ठ सदस्य शुभांगी पवार, आदी शाखेतील सर्व पदाधिकारी व धम्म बंधूभगिनी उपस्थित होत्या.
प्रारंभी महामानवांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून व त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आयु .प्रकाश रामचंद्र पवार यांनी उपस्थितांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घेतले. त्यानंतर शालेय विद्यार्थी व उच्च माध्यमिक शिक्षण यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कु.आयुष पवार, द्वितीय क्रमांक कु.स्वरा पवार, तृतीय क्रमांक परी पवार .तर उच्च माध्यमिक शिक्षण गटांमध्ये प्रथम क्रमांक करुणा पवार, द्वितीय क्रमांक कामिनी पवार, तृतीय क्रमांक प्रीशा पवार, उत्तेजनार्थ सुप्रिया पवार आदिनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.
या उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव शाखेच्या वतीने बक्षीसे देऊन करण्यात आला. या अमृत महोत्सवी संविधान दिनाच्या कार्यक्रमात शाखेचे पदाधिकारी प्रकाश भागुराम पवार, किशोर रामचंद्र पवार, रीना मंगेश पवार, सुभाष बाबू पवार, करुणा प्रमोद पवार यांनी भारतीय संविधानाबाबत विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी सुभाष पवार यांनी केले व शेवटी सर्वांचे आभार मानले.