(संगमेश्वर / एजाज पटेल)
२३-१०-२०२४ रोजी डेरवण क्रीडासंकुल या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा (खो-खो-१४वर्ष-मुलगे/मुली ) संपन्न साल्या. या स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्याच्या वतीने जि.प शाळा फणसवणे नं.१ खो-खो-मुलगे (14 वर्ष) या संघाने पहिल्या राउंड मध्ये दापोली संघाला 1डाव 14 गुणांनी पराभूत केले. उपांत्य सामन्यात लांजा संघाला पराभूत केले तर अंतिम सामन्यात राजापूर संघाला पराभूत करून जिल्हास्तरीय अंतिम विजय संपादन केला.
जिल्हा परीषदेची अत्यंत दुर्गम भागातीन शाळा असून सदर संघाने अंतिम विजेतेपद पटकावून अप्रतिम खेळ सादर केला. सदर संघात शाळेतील -आर्यन बालदे, चैतन्य गुरव, प्रथमेश बालदे, सार्थक बालदे, सम्यक मोहीते, पियुष गुरव, करण बालदे, श्रेयश कदम, वंश बुदर, हर्ष सनगरे, ओकार गरानटे, रुद्र मुख असा संघ होता.
संघ व्यवस्थापक श्री कदम सर तर प्रशिक्षक म्हणून श्री.विकास फटकरे सर तर विशेष प्रशिक्षण म्हणून श्री संजय तटकरेसर यांचे मार्गदर्शन बहुमूल्य ठरले.त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेसाठी शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री. संजय वणये गावच्या सरपंच श्रीम शारदा तांबे, माजी सरपंच श्री विठ्ठल गुरव त्याचबरोबर अस्मिता बालदे, दीपिका बालदे, रेश्मा सणगरे, विनायक घाणेकर विनोद बुदर आदी उपस्थित होते.
विस्तार अधिकारी त्रिभुवणे, गटशिक्षण अधिकारी पाटील, केंद्र प्रमुख दिलीप जाधव यांच्यासह तालुक्यातील शिक्षकांकडून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.