(रत्नागिरी)
तालुक्यातील टेंभ्ये येथील काजळी नदीकिनारी प्रातःविधीसाठी गेलेले असताना बेपत्ता झालेल्या वृध्दाचा मृतदेह बुधवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात सापडला. शरद लहू नागवेकर (६९, रा. हातिस, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे.
त्यांचा मुलगा संकेत शरद नागवेकर (३३, रा. हातिस, रत्नागिरी) यांनी याबाबत ग्रामीण पोलिस स्थानकाला खबर दिली आहे. मंगळवार १ रोजी सकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास शरद नागवेकर हे प्रातः विधी करण्यासाठी टेंभ्ये कोसंबीवाडी जवळील काजळी नदी किनारी गेले होते. दुपारी उशिरापर्यंत ते घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरुवात केली. ग्रामीण पोलिसांनाही माहिती दिली गेली. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला आहे.