(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारणी काही दिवसापूर्वीच प्रदेश स्तरावरून जाहीर करण्यात आली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे तालुका बांधणी सुरू आहे. या अनुषंगाने सोमवारी (दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी) दक्षिण रत्नागिरी जिल्हाअंतर्गत बैठकीचे आयोजन केले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीचे ठिकाण टीआरपी स्टॉप येथील अरविंद सावंत यांचे निवासस्थान, सावंत नगर येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. पक्ष मजबुतीसाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष गौतम गमरे आणि महासचिव मुकुंद सावंत यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांनी चंग बांधला आहे.
सर्व कमिटी बरखास्त करून पुनर्गठीत करावयाच्या आहेत तसेच जिल्हा महिला आघाडी, युवा आघाडी यांची सुद्धा कमिटी निर्माण करून महाराष्ट्र कमिटीकडे शिफारस करण्याच्या सूचना आहे. यामुळे तालुकास्तरावरून जास्तीत जास्त नावे शिफारस करण्याबाबत येत्या सोमवारी (दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी) दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत सर्व संविधानवादी, आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह या बैठकीला शिफारस करत असलेले पदाधिकारी व सर्व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा महासचिव मुकुंद सावंत यांनी केले आहे.
तसेच प्रत्येक तालुका स्तरावरून सुध्दा आवाहन करण्यात यावे जेणेकरून विस्तारित कार्यकारणी करणे शक्य होईल. बैठकीला हजर राहताना मागील कमिटीने आपला सर्व कार्यअहवालाची एक प्रत सोबत आणावी अशा सूचना सावंत यांनी तालुका पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.