(संगमेश्वर / दिनेश आंब्रे)
नावडी येथील युवा कार्यकर्ता कु. साहिल सुनिल आंबवकर (Msc) याने गेले तीन वर्ष घरगुती गणेशोत्सव सजावटीमध्ये विविध आकर्षक देखावे साकारलेले आहेत.
सन २०२२ मध्ये गणेशोत्सवमध्ये त्याने विठाई बसचां देखावा साकारला होता. त्यानंतर सन २०२३ मध्ये जेजुरी मंदिर देखाव्यातून उभे करून अतिशय अप्रतिम सजावट केली होती. यंदाच्या वर्षी इंडिया टीमने T-20 वर्ल्डकप जिंकला असल्यामुळे कु. साहिल आंबवकरने आपल्या महान भारत देशाचा अभिमान मनाशी बाळगून तसेच राष्ट्रीय खेळाडूंची मेहनत व खेळाबद्दलचे प्रेम या दुहेरी संगमाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून अतिशय सुरेख देखावा साकारला आहे. या संगमेश्वरच्या युवा कार्यकर्त्याने आपल्या शिक्षणाबरोबर देखावा सादर करण्याची कला जोपासली आहे.