(राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी जिल्हा पुनर्वसन समितीवर अशासकीय निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल राजापूर तालुक्यातील करक गावचे सरपंच श्री. सुरेश गुणाजी ऐनारकर यांचा बौद्ध विकास मंडळ करक आणि रमामाता महिला मंडळ करक, राहुलवाडी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बौद्ध विकास मंडळ करकचे अध्यक्ष श्री. जनार्दन राघो जाधव आणि शिंदे शिवसेना शाखा करकचे शाखाप्रमुख श्री. अनंत लाडू जाधव यांच्या हस्ते सुरेश ऐनारकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या सत्कार सोहळ्यादरम्यान करक येथील बुद्धविहारासाठी पुनर्वसन राखीव क्षेत्रातील जागा शासनाकडून बौद्ध विकास मंडळाच्या नावे मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन मंडळाच्या वतीने देण्यात आले. हे निवेदन स्वीकारून त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
सरपंच सुरेश ऐनारकर यांनी यापूर्वीही मंडळाच्या सामाजिक कार्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच मंडळाच्या विविध कार्यक्रमांमध्ये ते नियमितपणे उपस्थित राहत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी करक गावचे पोलीस पाटील श्री. महेंद्र लक्ष्मण जाधव, मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, खजिनदार प्रशांत रघुनाथ जाधव, प्रशांत यशवंत जाधव, अशोक लाडू जाधव, निलेश जाधव, नितेश धोंडीराम जाधव उपस्थित होते. तसेच रमामाता महिला मंडळ करकच्या अध्यक्षा सौ. शुभांगी जनार्दन जाधव, खजिनदार सौ. अर्पिता प्रशांत जाधव, सौ. साक्षी अनंत जाधव, सौ. स्वानंदी निलेश जाधव, सरिता जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


