(संगमेश्वर / प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची सर्वसाधारण सभा सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राजन आयरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत जिल्हा संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी रुपेश पंगेरकर, प्रकाश राजेशिर्के आणि माणिक यादव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी मोहन सुरेश बुरटे, उपाध्यक्षपदी सचिन पांडुरंग आंबेकर, कोषाध्यक्षपदी उदय अनिल साळवी, सचिवपदी उत्तम पांडुरंग पवार यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी सौ. मुग्धा महेंद्र पाध्ये आणि रमेश केशव गंधेरे यांची निवड झाली. स्पर्धाप्रमुख म्हणून निलेश यशवंत पावसकर, पराग गजानन लघाटे, प्रसिद्धीप्रमुख म्हणून काशिनाथ चंद्रकांत गुरव, तर महिला प्रतिनिधी म्हणून सौ. मिताली वीरेंद्र पाकळे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून श्रीनाथ कुळे, तुकाराम पाटील, प्रदीप शिवगण, सूर्यकांत पुजारी, योगेश कोकणी, श्रीराम महाजन, उदय लिंगायत, सचिन जड्याळ आणि रामचंद्र धुमाळ यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून जितेंद्र पराडकर, विष्णू परीट, तुकाराम दरवजकर, गजानन पांचाळ आणि बसवराज बिद्रीकोटीमठ यांची नियुक्ती करण्यात आली. प्रकाश राजेशिर्के यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील कलाध्यापकांचे संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच कलाशिक्षणाचा प्रसार व प्रचार करणे, कलाध्यापकांच्या विविध समस्या सोडविणे आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.


