(रत्नागिरी /प्रतिनिधी)
बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर कपडे वाळत घालत असताना तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. योगिता मारुती नार्वेकर (वय ५५, रा. गोळपसडा, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली होती. त्यानंतर रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, १९ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास योगिता नार्वेकर या आपल्या राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी तोल जाऊन त्या खाली पडल्या. या घटनेत त्यांच्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती त्यांचे भाऊ चंद्रकांत मारुती नार्वेकर यांनी दिली. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४०/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही पूर्णगड पोलीस करीत आहेत.


