(राजापूर/ तुषार पाचलकर)
राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजापूर तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा २०२६-२७’मध्ये १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या विभागात सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचलच्या कुमारी अनघा गजानन पळसुलेदेसाई हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे अनघाची रत्नागिरी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अनघाच्या या यशाबद्दल पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेश सावंत, कार्याध्यक्ष मा. श्री. अशोक सक्रे, सचिव श्री. रामचंद्र वरेकर, सहसचिव मा. श्री. किशोर नारकर, खजिनदार मा. श्री. राजन लब्दे तसेच सर्व सन्माननीय संचालकांनी तिचे अभिनंदन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. आशा गुरखे, पर्यवेक्षिका श्रीम. प्रमिला गांधी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्गानेही अनघाच्या यशाचे कौतुक केले. तिच्या या कामगिरीसाठी क्रीडा शिक्षक श्री. नितीन सांडम तसेच तिच्या कुटुंबीयांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
आगामी रत्नागिरी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतही अनघाने उत्तम कामगिरी करत यशाचे नवे शिखर गाठावे, यासाठी सर्व मान्यवर, शिक्षकवर्ग आणि कुटुंबीयांकडून तिला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.


