(विल्ये / अमित कांबळे)
सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गोपाळ गावणकर यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खंडाळा येथे (स्वप्नपूर्ती हॉटेलजवळ) आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन समारंभाला खंडाळा पंचक्रोशीतील तमाम शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर तसेच ग्रामस्थ बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख व निमंत्रक प्रथमेश गावणकर यांनी केले आहे.
प्रथमेशजी गावणकर हे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी, कामगार, मजूर तसेच आरोग्यविषयक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी सहा महिन्यांपूर्वी जनसंपर्क कार्यालय सुरू केले होते.
मागील सहा महिन्यांत कार्यालयात आपल्या विविध समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांचा वाढता ओघ लक्षात घेता, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सामाजिक प्रश्नांवर अधिक सक्षमतेने काम करण्यासाठी तसेच जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या समस्या कायदेशीर मार्गाने मांडण्यासाठी या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
नूतनीकरण करण्यात आलेल्या या कार्यालयाच्या उद्घाटनाचा सोहळा परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत अधिक उत्साहात आणि द्विगुणित आनंदाने साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. खंडाळा पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी केले आहे.

