(मुंबई / वृत्तसंस्था)
आगामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि दिवा येथून रत्नागिरी, सावंतवाडी रोड, चिपळूण, खेड आणि मडगाव या स्थानकांसाठी विविध विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत.
विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सवाच्या काळातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सावंतवाडी रोड विशेष गाड्या
– ट्रेन क्र. 01103/01104 (मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – CSMT): 11 ते 26 सप्टेंबर (CSMTहून) आणि 12 ते 27 सप्टेंबर (सावंतवाडीहून), प्रत्येकी 16 फेऱ्या.
– ट्रेन क्र. 01129/01130 (लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – LTT): 15 व 22 सप्टेंबर, प्रत्येकी 2 फेऱ्या.
– ट्रेन क्र. 01151/01152 (मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – CSMT): 11 ते 27 सप्टेंबर, प्रत्येकी 17 फेऱ्या.
– ट्रेन क्र. 01171/01172 (LTT – सावंतवाडी रोड – LTT): 11 ते 27 सप्टेंबर, प्रत्येकी 17 फेऱ्या.
– ट्रेन क्र. 01131/01132 (LTT – सावंतवाडी रोड – LTT): 17, 20, 24 व 27 सप्टेंबर, प्रत्येकी 4 फेऱ्या.
रत्नागिरी विशेष गाड्या
– ट्रेन क्र. 01153/01154 (मुंबई CSMT – रत्नागिरी – CSMT): 11 ते 26 सप्टेंबर (CSMTहून) आणि 12 ते 27 सप्टेंबर (रत्नागिरीहून), प्रत्येकी 16 फेऱ्या.
– ट्रेन क्र. 01167/01168 (LTT – रत्नागिरी – LTT): 11 ते 26 सप्टेंबर (मंगळ, बुध, गुरू, शनि व रवि) आणि 12 ते 27 सप्टेंबर (रत्नागिरीहून), प्रत्येकी 11 फेऱ्या.
– ट्रेन क्र. 01445/01446 (पुणे – रत्नागिरी – पुणे): 15 व 22 सप्टेंबर, प्रत्येकी 2 फेऱ्या.
– ट्रेन क्र. 01447/01448 (पुणे – रत्नागिरी – पुणे): 12, 19 व 26 सप्टेंबर, प्रत्येकी 3 फेऱ्या.
चिपळूण मेमू विशेष
– ट्रेन क्र. 01133/01134 (दिवा – चिपळूण – दिवा): 11 ते 26 सप्टेंबर (23 सप्टेंबर रोजी सेवा बंद) आणि 12 ते 27 सप्टेंबर (24 सप्टेंबर रोजी सेवा बंद), प्रत्येकी 15 फेऱ्या.
खेड मेमू विशेष
– ट्रेन क्र. 01155/01156 (दिवा – खेड – दिवा): 11 ते 27 सप्टेंबर. 22 सप्टेंबर रोजी देखभाल कामामुळे दोन्ही बाजूंनी सेवा बंद राहील. प्रत्येकी 16 फेऱ्या.
मडगाव विशेष गाड्या
– ट्रेन क्र. 01165/01166 (LTT – मडगाव – LTT): 15 व 22 सप्टेंबर, प्रत्येकी 2 फेऱ्या.
– ट्रेन क्र. 01185/01186 (LTT – मडगाव – LTT): 16 व 23 सप्टेंबर, प्रत्येकी 2 फेऱ्या.
अधिक माहितीसाठी pdf पाहा👇
77-Noti-26-27 – Running of Ganpati Special Trains-2026-CR
या विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरू होणार असून, प्रवाशांनी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ किंवा आरक्षण केंद्रातून वेळापत्रक व उपलब्धतेची माहिती तपासूनच आरक्षण करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा आयआरसीटीसी (IRCTC) अॅपला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे व मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

