(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुका युवा सेनेच्या वतीने पाचल येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ आणि ३ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत, युवा सेना कार्यकारिणी सदस्या अपूर्वा सामंत, राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले, रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजी, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, खाऊ तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त, परिश्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व सांगत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास युवा सेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, जिल्हा परिषद सदस्या शिधाली मोरे, युवा सेना तालुका समन्वयक सुरेश ऐनारकर, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासे, महिला विभागप्रमुख श्वेता पवार, युवती विभागप्रमुख विद्या लांजेकर, विभागप्रमुख युवराज मोरे, तळवडे पंचायत समिती उपविभागप्रमुख राहुल गोसावी, जि.प. शाळा पाचल क्रमांक १ व ३ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रद्धा जाधव, मुख्याध्यापक, शिक्षिका शुभांगी सागरे, जयश्री राठोड, उमा चिखली, प्रणाली घोलप तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा सेना राजापूर तालुक्याच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

