( चिपळूण / वार्ताहर )
गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये पुणे येथील Agio Pharmaceuticals Ltd तसेच गोवा येथील Markson Pharma आणि Gino Pharmaceuticals Ltd या नामांकित औषधनिर्माण कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
महाविद्यालयातील एकूण २४ विद्यार्थ्यांची प्रॉडक्शन व क्वालिटी कंट्रोल विभागासाठी विविध पदांवर निवड करण्यात आली असून संबंधित विद्यार्थ्यांना ऑफर लेटर प्रदान करण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. निवेदिता कांबळी, कु. एरम खान, श्री. सत्यजित पाटेकर, कु. तुबा महात, कु. आर्या निमुणकर, कु. वैष्णवी मालवणकर, कु. साक्षी आवेरे, कु. सानिका मालुसरे, कु. ईशा राणे, श्री. सोहम हुमणे, कु. जुई पाटील, श्री. वेद मिस्त्री, श्री. आशुतोष बक्कर, कु. दिशा घोरपडे, श्री. सुनील वीर, कु. सेजल कदम, कु. सृष्टी कदम, श्री. अथर्व गायकवाड, श्री. लक्ष्मण पिंगळे, कु. श्रुष्टी वाघे, श्री. निरज कदम, कु. तनुजा वाघमोडे, श्री. सोहम घाग आणि कु. मृणालिनी यादव यांचा समावेश आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी विद्यार्थ्यांना ऑफर लेटर प्रदान करून त्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच व्यवस्थापनाने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

