(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड तलाठी सजा मंडळामध्ये शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड ग्रामपंचायतीच्या कविवर्य केशवसुत सभागृहात सदर शिबिर 24 एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत होणार आहे.
रत्नागिरी महसूल विभागाच्या विशेष पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या नियोजनाबाबतची बैठक सोमवारी सायंकाळी मालगुंड ग्रामपंचायती च्या सभागृहात रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा बाबतची माहिती उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आली. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने या बैठकीत महाराजस्व समाधान शिबिराचे नियोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये ग्रामस्थांना विविध दाखले वाटप, रेशन कार्ड वाटप, संजय गांधी निराधार लाभार्थी, वर्ग दोन च्या जमिनी वर्ग 1करणे इत्यादी लाभ देण्यात येणार आहे. या शिबिराबाबतची सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य राजू साळवी यांनी आपल्या मनोगतातून नियोजनात्मक बैठकीत दिली. यावेळी त्यांनी रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून महसूल विभागाचे काम अतिशय चोखपणे व सुरळीत सुरू असल्याबद्ल विशेष कौतुक केले.
मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या या नियोजनात्मक बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य राजू साळवी व पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गवळी, मालगुंड तलाठी सजाचे मंडळ अधिकारी अरुण जाधव मालगुंडचे तलाठी राजेश वीर, महसूल सेवक सुशील दुर्गवळी, मंदार यादव आदींसह मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर, श्रेया राजवाडकर – भगवतीनगर सरपंच, सन्मान मयेकर ग्रा.पं.सदस्य,मालगुंड,रविना कदम – निवेंडी सरपंच,नेहा शीतप -उपसरपंच, निवेंडी, प्रविण साळवी -तंटमुक्ती अध्यक्ष निवेंडी,
दिवाकर कदम तळेकरवाडी -पो.पाटील, नितीन मायंगडे- निवेंडी पोलीस पाटील, विश्वनाथ पाटील -पोलीस पाटील गणपतीपुळे,
मालगुंड महसूल गावांचे पोलीस पाटील अमोल राऊत, आस्था पाटील, शशिकांत पवार, निधी मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
“शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत होणाऱ्या या शिबिराला मालगुंड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मालगुंड तलाठी सजा मंडळाच्या वतीने व रत्नागिरी महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

