( संगमेश्वर / प्रतिनिधी )
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाने (इस्कॉन ) विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्ये रूजविण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये भगवद्गीतेवर आधारित मूल्यशिक्षण संवर्धन प्रतियोगितेचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केले होते. सदर स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी कु.गगन संदिप शिंदे याला गुणानुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.त्याच्या या यशा बद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन केलं जात आहे.
व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर ही प्रशाला विविध बाह्य उपक्रमामध्ये नेहमीच सहभागी होते. प्रशालेतील अनेक विद्यार्थी अशा स्पर्धेमधून उल्लेखनीय यश प्राप्त करत असतात. प्रशालेतील इयत्ता सहावी मधील गगन संदीप शिंदे या विद्यार्थ्याने भगवद्गीतेवर आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचे व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे मुख्याध्यापक सचिन देव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, प्रसाद येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी गगन याचे अभिनंदन केले आहे. प्रशालेत संस्था सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गगन याला सन्मानित करण्यात आले.

