(खेड)
खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नागेशशेठ तोडकरी यांचे चिरंजीव कडवट शिवसैनिक सिद्धेश नागेश तोडकरी यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे खेड शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.
सिद्धेश तोडकरी हे शांत व सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांना परिचित होते. त्यांच्या अकाली जाण्याने मित्रपरिवार, नातेवाईक तसेच स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तोडकरी कुटुंबाशी शहरातील अनेकांचा घनिष्ठ संबंध असल्याने अनेकजण आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
सिद्धेश तोडकरी हे दोस्तीच्या दुनियेत ‘राजा माणूस’ म्हणून ओळखले जात होते. तसेच त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी जपलेले जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या या दुःखद प्रसंगात विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहवेदना व्यक्त करत आहेत.
स्व. सिद्धेश तोडकरी यांची अंत्ययात्रा आज (रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी) सकाळी खेड बाजारपेठ येथून निघणार आहे. अंत्यदर्शनासाठी आणि अंतिम निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या दुःखद घटनेमुळे तोडकरी कुटुंबीयांवर ओढवलेल्या संकटात संपूर्ण खेड शहर त्यांच्या पाठीशी उभे असल्याची भावना व्यक्त होत आहे. स्व. सिद्धेश तोडकरी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी सर्वत्र प्रार्थना करण्यात येत आहे.

