( राजापूर )
तालुक्यातील वाटुळ तिठा येथे आज (गुरुवारी) सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास एक अपघात घडला. अचानक कुत्रा गाडीसमोर आडवा आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच्या अंगणात घुसली. या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून चालक व त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणहून गोव्याच्या दिशेने जात असताना श्री. शामकांत पाटणे यांच्या व्हॅगनार (MH-05-DH-0392) या कारला अपघात झाला. त्यांच्या सोबत पत्नीही प्रवास करत होत्या. भांबेडकडून वाटुळ तिठ्याकडे येताना उतारावर अचानक एक कुत्रा गाडीसमोर आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर कार रस्त्याच्या बाजूला जाऊन थेट श्री. सावंत यांच्या घराच्या अंगणात घुसली. अपघातात वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. या अपघातात चालक शामकांत पाटणे आणि त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

