काही काळापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळा दरम्यान साध्या वेशात रुद्राक्षांच्या माळा विकताना सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निळसर घारे डोळे आणि साधेपणामुळे देशभरात प्रसिद्ध झालेल्या या तरुणीने आता आपल्या प्रियकर फरमान खानसोबत घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले आहे. मोनालिसाने Thiruvananthapuram, Kerala येथील Arumanoor Temple मंदिरात पोलीस संरक्षणात फरमान खानसोबत विवाह केला.
सोशल मीडियावरून झाली ओळख
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश मधील इंदोर येथील मोनालिसा आणि महाराष्ट्रातील फरमान खान हे गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांची ओळख Facebook या सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले.
घरच्यांचा विरोध, तरीही लग्नाचा निर्णय
मोनालिसाच्या या प्रेमसंबंधाला तिच्या कुटुंबीयांकडून तीव्र विरोध होत होता. तिचे वडील जयसिंह भोसले यांनी या नात्याला विरोध दर्शवला होता. कुटुंबीयांकडून दबाव आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही मोनालिसाने केला आहे. घरचे या लग्नाला कधीच तयार होणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर मोनालिसाने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि थेट केरळमध्ये जाऊन प्रियकर फरमान खानसोबत विवाह केला.

पोलीस संरक्षणात झाला विवाह
लग्नापूर्वी मोनालिसाने Thampanoor Police Station येथे जाऊन पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. तिने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, तिच्या इच्छेविरुद्ध कुटुंबीयांकडून लग्न लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरुवातीला मोनालिसा अल्पवयीन असल्याचा दावा केला जात होता. मात्र पोलिसांच्या तपासात ती १८ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह पार पडला.
लग्न सोहळ्यात नेत्यांची उपस्थिती
या विवाह सोहळ्याला V. Sivankutty, M. V. Govindan आणि खासदार A. A. Rahim उपस्थित होते. या विवाहाबद्दल प्रतिक्रिया देताना ए. ए. रहीम म्हणाले, “हा विवाह सौहार्दाचे उदाहरण आहे. हीच खरी ‘केरला स्टोरी’ आहे.”
चित्रपटामुळेही चर्चेत
दरम्यान, कुंभमेळ्यात व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाला चित्रपटाची ऑफर मिळाली असून तिचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटाचा ट्रेलर फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

