(संगमेश्वर / वार्ताहर)
अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळ कारभाटले–शृंगारपूर संचलित प्रचितगड माध्यमिक विद्यालय, कारभाटले येथे बुधवार, ४ मार्च रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेच्या विकासासाठी अधिकृतरीत्या ‘माजी विद्यार्थी संघा’ची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने आपल्या जुन्या शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली. दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीत व समूहगीताने उपस्थितांचे मन जिंकले आणि वातावरणात उत्साह निर्माण झाला.
यावेळी श्री. बाळू होडे, श्री. रोहिदास पोंमेंडकर, श्री. पांडुरंग घोरपडे, श्री. सुभाष पवार, श्री. सुभाष होडे, श्री. विनय होडे, श्री. नबील तांबू, श्री. राजू पोंमेंडकर, श्री. नासीर पाटणकर, श्री. विनोद पवार, श्री. धनाजी भांगे, श्री. धनाजी बेंद्रे तसेच सौ. चंदना बांबाडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. राजेंद्र पोंमेंडकर यांनी शाळेसमोर उभ्या असलेल्या विविध आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, विद्यालयाची घटत चाललेली पटसंख्या ही चिंतेची बाब असून ती वाढवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, आधुनिक शैक्षणिक उपक्रम आणि विविध शैक्षणिक योजना राबवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. श्री. संतोष गुरव आणि श्री. प्रदीप सोलकर यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. विशेष म्हणजे, श्री. विनोद म्हस्के यांनी पुढील वर्षी प्रवेश घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची घोषणा केली, ज्याचे उपस्थितांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
मेळाव्याच्या औचित्य साधून ‘माजी विद्यार्थी संघा’ची अधिकृत स्थापना करण्यात आली. या संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या संघाच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधा वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे आणि विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करून देणे यासाठी काम करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या स्नेहमेळाव्यास श्री. राहुल गुरव, श्री. गणेश साटले, श्री. अमित पवार, श्री. सतीश जाधव, श्री. रविंद्र कुळ्ये, श्री. उदय धांगडे, श्री. महेंद्र होडे, श्री. प्रसाद होडे, श्री. सुदेश पवार, श्री. मिलिंद कांबळे, श्री. प्रविण पवार, श्री. प्रणय पवार, श्री. मनोज पवार, श्री. जगदिश कदम, श्री. संग्राम पवार, श्री. संदेश पवार, श्री. अमोल पवार, श्री. अक्षय गुरव, श्री. निलेश पवार, श्री. जितेंद्र कदम, श्री. विनोद पवार, श्री. सुशील पवार, श्री. अविनाश घडशी, श्री. सतीश कदम, श्री. रविंद्र कदम, श्री. रूपेश पोंमेंडकर, कु. भाविका पवार, कु. अपूर्वा घोरपडे, श्री. ओमकार पंडित, श्री. प्रवीण जाधव, श्री. जितेंद्र सुर्वे, श्री. रूपेश सावंत, श्री. प्रशांत कदम, श्री. सुयोग पवार, श्री. किरण पवार यांसह शेकडो माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन श्री. राहुल गुरव व श्री. प्रसाद होडे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. धनाजी बेंद्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. धनाजी भांगे यांनी केले. या स्नेहमेळाव्यास स्थानिक ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

