(जाकादेवी / संतोष पवार)
कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महिलांचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन दापोली तालुक्यातील त्यागमूर्ती माता रमाई राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय महिला अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते होणार आहे.
या राज्यस्तरीयअधिवेशनासाठी प्रमुख अतिथी म्हणून दापोली नगरपंचायतचे नगराध्यक्षा सौ. कृपा शशांक घाग, कोकण प्रदेश अध्यक्षा सौ. प्रज्ञा प्रदीप वाघोदे, दापोली तालुक्याचे तहसीलदार श्रीम.अर्चना बोंबे, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीम. नीलिमा नाईक, शिक्षक संघटनेचे राजाध्यक्ष आकाश तांबे, प्रमुख अतिथींसह पंचायत समिती सदस्या सुवर्णा खळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्यचिटणीस रविद्र पालवे, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष किरण मानकर, राज्याचे कोषाध्यक्ष प्रदीप वाघोदे, समाज कल्याण माजी सभापती भगवान घाडगे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. माधुरी उमेश तायडे, वणंद गावचे पोलीस पाटील सोनाली काते, माता रमाई महिला मंडळाचे अध्यक्षा समीरा धोत्रे, सचिव सौ. प्रवीणा धोत्रे, वणंदगाव महिला मंडळ अध्यक्षा सौ. प्रिया कदम आदी उपस्थित राहणार आहेत.
राज्य महिला अधिवेशनाच्या निमित्ताने माता रमाई जीवन कार्य या विषयावर प्रभावी व्याख्यान राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ महाराष्ट्र राज्याच्या राज्याध्यक्ष सरोज पैठणे मार्गदर्शन करणार आहेत, तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील महिलांचे योगदान या विषयावर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तरी या राज्य महिला अधिवेशनासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अभ्यासू राज्याध्यक्ष आकाश तांबे यांनी सांगितले.
राज्य अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, महिलावर्ग, दापोली तालुक्याचे अध्यक्ष बिपीन मोहिते, सहसचिव प्रमोद गमरे तसेच दापोली तालुका पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी अधिक मेहनत घेत आहेत. या महिला अधिवेशनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.

