(संगमेश्वर /एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड, येथे एका दुर्दैवी अपघातात 55 वर्षीय राम स्वरुप रामअवतार सरोज यांचा आकस्मिक मृत्यू झाला. तो मूळ गाव पुर, कोत्वाश्कुल्पुर (ता. लालगंज, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) येथील रहिवासी होता. ही घटना आज (दि. 26 फेब्रुवारी 2026 ) रोजी सुमारे दुपारी 12.00 वाजता युनायटेड स्टोन क्रशरवर काम करत असताना उंचावरून खाली कोसळून घटना घडली. उंचावरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि तो बेशुद्ध पडला. त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर येथे आणले गेले. तेथील डॉक्टर मोरे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
मृतदेहाचे शवविच्छेदन डॉक्टर मोरे यांनी करून ताब्यात दिले. क्रशरचे मालक जाहीद अजीज खान (रा. स्टेट बँक ऑफ इंडीया कॉलनी, रत्नागिरी) यांचे मालकीचे क्रशर असून यांनी पोलिसांना सर्व माहिती दिली आणि अपघाताच्या नोंदीस सहकार्य केले. संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. कोलगे व पोलीस हवालदार व्ही.व्ही. कोष्टी करीत आहेत.

