(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील आधुनिक मराठी कवितेचे जनक असलेल्या कविवर्य केशवसुतांच्या स्मारकात शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरी आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.३० कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे होणार आहे. या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या पुस्तकाचे अभिवाचन/नाट्यवाचन आणि खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरी आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड तसेच मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरी आणि मालगुंड शाखा यांचे वतीने मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात विविध उपक्रम आणि भरगच्च कार्यक्रमानी साजरा केला जातो. यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नेटक्या स्वरूपात करण्यात आले असून खुल्या कवी संमेलनात विविध नामांकित कवींच्या काव्यरचना ऐकण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे.
यावेळी सर्व कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य, साहित्यिक, साहित्यप्रेमी, कवी, गायक यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरी आणि मालगुंड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे तसेच खुल्या कवी संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

