(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांडो क्लब आणि रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप येथील गणराज तायक्वांडो क्लब, रत्नागिरी येथे गुरुवार, 19 फेब्रुवारी 2026 रोजी बेल्ट ग्रेडेशन परीक्षा पार पडली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
ही परीक्षा जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कर्रा तसेच क्लबच्या सचिव व प्रमुख प्रशिक्षक सौ. रंजना मोडूळा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. शिस्त, तंत्र आणि आत्मविश्वास यांचा सुरेख मिलाफ दाखवत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे :
येलो बेल्ट
श्रीनय आकाश कदम
आर्या प्रशांत वराडकर
श्राव्या संकेत वाडकर
ग्रीन बेल्ट
स्वराली समीर जाधव
शौर्य समीर जाधव
मीरा अवदूत वांयगणकर
ब्ल्यू बेल्ट
विधी विवेककुमार दुबे
स्पर्श किरण रेडीज
ब्ल्यू 1 बेल्ट
निरज प्रशांत मकवाना
आध्य आशिष रसाळ
रेड 1 बेल्ट
आहाना आशिष रसाळ
तीर्था प्रशांत मकवाना
या यशस्वी खेळाडूंना Taekwondo Association of Maharashtraचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कर्रा, रत्नागिरी जिल्हा सचिव लक्ष्मण कर्रा, कोषाध्यक्ष शशांक घडशी तसेच गणराज क्लबचे पदाधिकारी आणि मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास क्लबच्या अध्यक्ष अॅड. सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्ष सौ. साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूळा, सदस्य सौ. स्नेहा मोरे, श्री परेश मोंडूळा, श्रीमती शलका जावकर, पालकवर्ग आणि सिनियर खेळाडू डॉ. मयुरेश नडगिरी यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते.
या यशामुळे रत्नागिरीतील तायक्वांडो चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

