(संगमेश्वर /प्रतिनिधी)
श्री.विठ्ठलराव जोशी ट्रस्ट डेरवण आणि श्री. झोरेज ॲकॅडमी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने डेरवण येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित भाईशा घोसाळकर हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले.
डेरवण येथे पार पडलेल्या स्पर्धेत १३ वर्षाखालील मुली गटामध्ये आर्या जोशी द्वितीय क्रमांक, १५ वर्षाखालील मुली गटामध्ये स्वरा इंजळे प्रथम क्रमांक, परिणीती कांबळे द्वितीय क्रमांक, १५ वर्षाखालील मुले गटात स्वराज चव्हाण द्वितीय क्रमांक, साईराज सुर्वे तृतीय क्रमांक तर क्षितिज सरमोकादम याने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संतोष साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले.व्यवस्थापक म्हणून आप्पासाहेब शेंडगे,अरविंद सुर्वे पालक श्रद्धा इंजळे यांनी मेहनत घेतली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत यळगुडकर, सचिव वसंत उजगावकर, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी अभिनंदन केले.

