(रत्नागिरी)
३५ वी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अंजिक्यपद तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबची खेळाडू कु. त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिने उत्तुंग कामगिरी करत रौप्य पदक पटकाविले.
या स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले होते. राज्यभरातून सुमारे ३०० स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कु. त्रिशा मयेकर ही लोकनेते शामरावजी पेजे आर्ट, कॉमर्स आणि सायन्स ज्युनिअर कॉलेजची इयत्ता १२ वीची विद्यार्थिनी असून ही तिची १७ वी राज्यस्तरीय स्पर्धा आणि वरिष्ठ गटातील पहिलीच स्पर्धा होती. पहिल्याच वरिष्ठ गटातील आव्हानात्मक स्पर्धेत तिने छाप पाडत रौप्य पदक पटकावले.
त्रिशाला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू व एशियन युनियन कोच श्री. प्रशांत मनोज मकवाना असून महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना आहेत. या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गणराज क्लबने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच उत्कृष्ट कामगिरीची परंपरा जपलेली आहे. त्रिशाच्या यशात तिच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे,
महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारिणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर,
जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी, तसेच गणराज क्लबचे पदाधिकारी अध्यक्ष सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूंळा, सौ. स्नेहा मोरे, श्री. परेश मोंडूला, शलाका जावकर, एस.आर.के. प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत, पालकवर्ग यांनी त्रिशाचे मनपूर्वक अभिनंदन केले.

