(मुंबई)
जगप्रसिद्ध आणि आंब्यांच्या राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कोकण हापूस’ आंब्यावर भौगोलिक मानांकनाच्या (GI Tag) वादातून मोठे संकट उभे ठाकले आहे. गुजरातने या आंब्यावर दावा करत ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने २०२३ मध्ये ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
जगात ‘कोकण हापूस’ हे हापूस आंब्याला मिळालेले पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे. हे मानांकन कोकणातील हापूस उत्पादकांना एक सुरक्षित बाजारपेठ आणि आर्थिक सुरक्षा मिळवून देते. कोकण हापूसला २०१८ मध्ये भौगोलिक मानांकन मिळाले. यापूर्वी २०२२ मध्ये, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने देखील ‘हापूस आंबा’ नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला आहे.गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने २०२३ मध्ये ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. या अर्जावर ३० ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी पार पडली आहे.
या अर्जाला कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांनी सांगितले की, कोकण हापूसमध्ये बाहेरील प्रदेशातील हापूस मिसळून सतत भेसळ केली जाते. यावर नियंत्रण आणण्यासाठी QR कोड प्रणाली लागू केली असली, तरीही भेसळ थांबत नाही. अशा परिस्थितीत ‘वलसाड हापूस’ला GI मिळाले तर कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते.
जगात ‘कोकण हापूस’ हे हापूस आंब्याला मिळालेले पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे. डॉ. भिडे यांनी यापूर्वी आफ्रिकेतील ‘मलावी हापूस’ या नावालाही आक्षेप नोंदवला होता.
त्यांच्या मते, ‘कोकण हापूस’ हे GI मानांकन फक्त कोकणातील चार जिल्ह्यांत उत्पादित होणाऱ्या विशिष्ट जातीच्या हापूस आंब्यासाठीच आहे. भविष्यात ‘शिवणे हापूस’ किंवा ‘कर्नाटक हापूस’ अशा नावांनी अर्ज आल्यास त्यालाही जोरदार विरोध केला जाणार आहे.
या वादामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. GI मानांकनाचे महत्त्व लक्षात घेता, ‘वलसाड हापूस’ला मान्यता मिळाल्यास कोकण हापूसची बाजारपेठ आणि किंमत दोन्हीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

