(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मौजे तरवळ येथील प्रसिद्ध ग्रामदेवता श्री देव कालिका देवी मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.
श्री देव कालिका देवी मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता नित्य पूजा, सकाळी ९ वाजता अभिषेक, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० वाजता महिलांचे हळदीकुंकू, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ७ वाजता आरत्या व भोवत्या, रात्री ९ वाजता सुश्राव्य भजन आणि रात्री १० वाजता श्री कालिका देवी मंडळ मुंबई यांचे ‘ बायको म्हणून तूच हवीस’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
श्री देव कालिका देवी मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला जाणार असून सर्व भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री देव कालिका देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळ, गाव प्रमुख, सर्व अधिकारी, मानकरी तसेच ग्रामस्थ मंडळींनी केले आहे.
वर्धापन दिन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी श्री देव कालिका देवी ट्रस्ट, विश्वस्त मंडळ आणि सर्व पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत.

