(चिपळूण)
वहाळ जिल्हा परिषद गटातील कळंबट गावचे माजी सरपंच तसेच कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते सखाराम कोकमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. कोकमकर यांनी कुणबी शिक्षण मंडळ हायस्कूलचे माजी चेअरमन तसेच कळंबट गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशी अनेक महत्वाची पद भूषवली आहेत. वहाळ जिल्हा परिषद गटात हे प्रतिष्ठित असं नाव असून त्यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेशावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, विलास चाळके, राजेंद्र महाडीक, संदीप सावंत, सुचित शिरकर उपस्थित होते.

