(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्याचा सब ज्युनियर मुले व मुली डॉजबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड येथे हा संघ रवाना झाला. या संघाला २४ ट्रॅक सूट खंडाळ्यातले प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व आणि प्रसाद लॅबोरेटरीचे मालक प्रसाद पेढे यांनी सामाजिक बांधिलकी जपत देणगी रूपाने दिले. तसेच या दोन्ही संघानाही त्यांनी विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या देणगीबद्दल रत्नागिरी डॉजबॉल जिल्हा असोसिएशनचे धडाडीचे व उपक्रमशील अध्यक्ष डॉ.राजेश जाधव, सचिव उदयराज कळंबे, लाभार्थी खेळाडू विद्यार्थी यांनी देणगीदार प्रसाद लॅबोरेटरीचे मालक प्रसाद पेढे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले.

