(रत्नागिरी)
दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हापसा (गोवा) येथे वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन तर्फे गोवा ओपन इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत केनिया, दक्षिण आफ्रिका, नेपाळ तसेच भारतातील विविध राज्यांमधील सुमारे ८०० कराटेपटूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील एम. एम. ए. फिटनेस सेंटरच्या १६ कराटेपटूंनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. फुनाकोशी कराटे ऑर्गनायझेशनचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख व तिसऱ्या डिग्री ब्लॅकबेल्ट कराटे प्रशिक्षक श्री. जावेद मिरकर, सहाय्यक प्रशिक्षक नौशीन कापडी आणि अयान मिरकर यांच्या नेतृत्वाखाली या खेळाडूंनी सहभाग घेतला.
रत्नागिरीच्या सर्वच १६ कराटेपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण २९ पदके मिळवली आणि जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल केले.
मुलींच्या गटातील विजेते:
- जैनब फकीर (५ वर्षे): काता – रौप्य, फाईट – कांस्य
- मेहविश फकीर (६ वर्षे): काता – सुवर्ण, फाईट – रौप्य
- युविका पिलणकर (६ वर्षे): काता – कांस्य, फाईट – सुवर्ण
- सिमराह मजगावकर (६ वर्षे): काता – कांस्य, फाईट – कांस्य
- जोया बुडये (१२ वर्षे): काता – कांस्य
- फातिमा बुडये (१३ वर्षे): काता – कांस्य
- आयेशा मजगावकर (१३ वर्षे): काता – रौप्य, फाईट – रौप्य
मुलांच्या गटातील विजेते:
- ईझान कापडे (५ वर्षे): काता – रौप्य
- सलमान मजगावकर (६ वर्षे): काता – सुवर्ण, फाईट – सुवर्ण
- अमीन काझी (७ वर्षे): काता – सुवर्ण, फाईट – सुवर्ण
- देव सरदेसाई (७ वर्षे): काता – रौप्य, फाईट – कांस्य
- अब्दुल मुबदी धामस्कर (१० वर्षे): काता – रौप्य, फाईट – कांस्य
- झीयान अहमद शेख (११ वर्षे): काता – कांस्य, फाईट – रौप्य
- रेहान मजगावकर (११ वर्षे): काता – सुवर्ण, फाईट – कांस्य
- उजैर मस्तान (१३ वर्षे): काता – कांस्य, फाईट – कांस्य
- जैद बुडये (१४ वर्षे): काता – रौप्य, फाईट – कांस्य
एकूण १६ कराटेपटूंनी दोन प्रकारांमध्ये मिळून २९ पदके पटकावत अभूतपूर्व यश संपादन केले. प्रमुख प्रशिक्षक जावेद मिरकर यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल समाधान व्यक्त करत खेळाडू व सहाय्यक प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. या विजेत्या खेळाडूंवर आणि प्रशिक्षकांवर रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

