(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीम. नियती योगेश चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्ष, सचिव आणि सर्व कार्यकारिणीवर महिलांना बिनविरोध निवड करून आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
संगमेश्वर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना ( DNE 136) ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १२ रोजी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री रवींद्र लोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची नुतन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. तसेच ग्रामपंचायत अधिकारी वर्गाच्या विविध परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला.
नुतन तालुका कार्यकारिणी निवड करताना जिल्ह्यात प्रथमच संघटनेच्या. सर्व कार्यकारिणीवर महिलांना संधी देऊन आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी अध्यक्षपदी श्रीमती नियती योगेश चव्हाण तर सचिव पदी श्रीमती तृप्ती योगेश मोहिरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी श्रीमती संजीवनी संतोष गवंडी, सहसचिव पदी श्रीमती समिक्षा समीर मोहिते, सल्लागारपदी श्रीमती मेघा रवींद्र सुवारे, कार्यकारिणी सदस्य म्हणून श्रीमती श्रृती रूपेश सावंत, जान्हवी मंदार आंबेकर, गितांजली हिरालाल चावरे, सोनम कुंभार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या राज्य संघटनेवर संगमेश्वर तालुक्यातून श्रीमती शैला कृष्णा नटे यांची महिला कौन्सीलर म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या सर्व सभासदांनी नुतन तालुका कार्यकारिणी बिनविरोध निवडून दिल्यामुळे विशेष समाधान व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष रवींद्र लोटणकर, सचिव श्री राजेन्द्र पाटील, पतसंस्था संचालक श्री राजेश इंदूलकर श्री अनिल गोपाळ, श्री सुहास शिंदे, श्री रमेश चाळके, श्री अखिलेश गमरे, श्री अभिजित शेळके, श्री प्रशांत शेट्ये यांनी नुतन तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या तर नुतन अध्यक्ष श्रीमती चव्हाण यांनी काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार मानले.

