(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका थिबाराजा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टची सर्वसाधारण वार्षिक सभा आयुष्यमान प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन शिवाजीनगर रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहाने व शांततेच्या मंगलमय वातावरणात पार पडली.
यावेळी विचार मंचावर थिबा राजा कालीन बुद्ध विहार स्थळ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष एमबी कांबळे, सचिव विजय मोहिते, सल्लागार ॲडव्होकेट – शिवराज जाधव, मंगेश सावंत, सहसचिव सुहास कांबळे, शशिकांत कांबळे आदी मान्यवर व संचालक विविध गावातील ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्वलीत करून व त्रिशरण पंचशील ग्रहण करून सभेला सुरवात करण्यात आली.
त्यानंतर सभेचं प्रास्ताविक अध्यक्ष प्रकाश पवार यांनी केले. अध्यक्षांच्या प्रास्ताविकानंतर समाजातील ज्ञात अज्ञात व अतिवृष्टीच्या पूरग्रस्थात मृत पावलेल्या समाजबांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर मागील आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली. ट्रस्टच्या दोन संचालक पदांच्या रिक्त जागी जेष्ठ समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तीमत्व फणसोप गावचे सुपुत्र आयु. मिलिंद कांबळे आणि कोतवडे गावचे सुपुत्र नरेश कांबळे यांची निवड करण्यात आली.
ट्रस्टच्या उत्तम कामकाजाबाबत सल्लागार वकील शिवराज जाधव, मंगेश सावंत, अध्यक्ष प्रकाश पवार यांनी उत्तम प्रकारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेला उपाध्यक्ष भगवान जाधव, कोषाध्यक्ष प्रितम आयरे, संचालक व माजी तहसीलदार विजय जाधव, रविंद्र पवार, दिपक जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रजत पवार, रविकांत पवार गुरुजी, सुनील कांबळे, दिनकर कांबळे, जयवंत कदम गुरुजी, किशोर रा.पवार, त्याचबरोबर महिला मंडळाच्या जेष्ठ कार्यकर्त्या सौ.तृप्ती कांबळे, दिया नरेश कांबळे, करुणा पवार, दिप्ती कांबळे, शितल पवार यांचेसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
शेवटी सर्वांचे आभार सहसचिव सुहास कांबळे यांनी मानले. अतिशय शिस्तबद्ध व शांततेत ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्याबद्दल उपस्थित सर्वांनीच आनंद व्यक्त करत समाधान व्यक्त केले.

