(रत्नागिरी)
भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिक व युवक-युवतींनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, युवा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, तसेच मनोज पाटणकर, निलेश आखाडे, संदीप सुर्वे, शैलेश बेर्डे, नितीन जाधव, समीर वस्ता यांसारखे मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश आखाडे यांनी केले. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी शहरातील 45 पेक्षा अधिक गणेश भक्तांनी यामध्ये सहभाग नोंदविला. सर्वच गणेश भक्तांनी बाप्पासाठी चांगली सजावट केली होती असे ते म्हणाले. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे यांनी या स्पर्धेचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपले मत व्यक्त करताना दरवर्षी अशी स्पर्धा घेतली जावी शहर मंडळ भारतीय जनता पार्टी यांनी उत्तम नियोजन करून ही स्पर्धा संपन्न केली, त्याबद्दल सर्व कार्यकर्ते आणि सहभागी व विजेते यांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक – साईराज प्रकाश नाचणकर, तेली आळी यांना मिळाले शिल्ड व रोख रक्कम देऊन त्यांना गौरवण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक अर्जुन गोलतकर, नाकोडा पार्क पावर हाऊस नाचणे रोड यांनी मिळविला त्यांना शिल्ड व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. तसेच तृतीय पारितोषिक शुभम सचिन आडमकर मच्छी मार्केट यांना मिळाला शिल्ड व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तर उत्तेजनार्थ – दीपिका दिनेश कुबल, भगवती बंदर आणि उत्तेजनार्थ – मयूर राजेंद्र आग्रे, सुवरेवाडी यांनी पटकावला शिल्ड व रोख रक्कम देऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व विजेत्यांना गौरविण्यात आले. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना ट्रॉफी देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना शिल्ड व रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक परंपरांचा सन्मान राखत नवनवीन माध्यमांतून सहभागी होण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, सरचिटणीस निलेश आखाडे व संदीप सुर्वे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी करून संपूर्ण सोहळा संस्मरणीय केला.
या स्पर्धेचे परीक्षण कला क्षेत्रात नॅशनल विजेते विलास रहाटे यांनी पाहिले. कार्यक्रमाच्या व्यवस्थापनामुळे संपूर्ण सोहळ्यात आनंदाचे व सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

