(चिपळूण)
२२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२५ दरम्यान डी.ए.व्ही. कॉलेज भांडुप आयोजित मरीन लाईन मुंबई येथे झालेल्या आंतर कबड्डी स्पर्धेत कोकण झोन कबड्डी मुलांच्या संघाने दुसरे स्थान पटकावले आहे. या संघातील कु. निलेश शिंदे या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली असून ०१ ते ०५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मेडिकॅप्स विद्यापीठ, ए. बी. रोड, पिगडंबर, राऊ, इंदौर येथे आयोजित होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर- विद्यापीठ कबड्डी (पुरुष) स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
त्याबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि श्री. आनंदराव पवार कॉलेजचे चेअरमन मल्लेश लकेश्री, प्रशांत देवळेकर (कार्यवाह), सिद्धेश लाड (कोषाध्यक्ष), रजिस्ट्रार अजित खेडेकर, पी. आर. ओ. योगेश चोगले, महाविद्यालयाच्या प्राचार्या अरुणा सोमण मॅडम, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

