(चिपळूण)
शिस्तबद्ध प्रयत्न, जिद्द आणि अथक मेहनतीच्या जोरावर समाजातील युवकाने घवघवीत यश संपादन केले आहे. चिपळूण येथील कु. अभिषेक उदय गांधी यांनी अॅडलेड विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षण पूर्ण करत पदवीदान सोहळ्यात सहभाग नोंदवला.
अभिषेक यांच्या या उज्ज्वल यशामुळे गांधी कुटुंबासह चिपळूण वैश्य समाज व स्थानिक नागरिकांचा अभिमान उंचावला आहे. अॅडलेड विद्यापीठाच्या भव्य सभागृहात झालेल्या या समारंभात अभिषेक यांचे नाव जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
“योग्य निर्णय, परिश्रम, शिस्त आणि अढळ आत्मविश्वास यांच्या जोरावर स्वप्नं साकार होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक,” असे मत समाजबांधवांनी व्यक्त केले. स्वामींच्या कृपाशिर्वादाने आणि आई-वडिलांच्या संस्कारामुळे हे यश शक्य झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी चिपळूण वैश्य समाज तर्फे विशेष अभिनंदन करत अभिषेक यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

