(मुंबई)
१३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली जाणार आहे. या दिवशी वाहनधारकांना प्रलंबित ट्रॅफिक चालानवर पूर्ण माफी किंवा ७०% पर्यंत सूट मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत लोक अदालत भरवली जाणार असून वाहनधारकांनी हा दिवस चुकवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. छोट्या स्वरूपाच्या उल्लंघनांवर ही सूट लागू होईल, मात्र गंभीर गुन्ह्यांवरील चालानवर सवलत मिळणार नाही.
सूट मिळणारे चालान
- सीटबेल्ट न लावणे
- हेल्मेट न घालणे
- रेड सिग्नल ओलांडणे
- चुकीचे चालान
- वेगमर्यादा ओलांडणे (स्पीडिंग)
- वैध PUC नसणे
- नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे
- लायसन्सशिवाय वाहन चालवणे
- वाहन फिटनेस प्रमाणपत्र नसणे
- चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणे
- ट्रॅफिक सिग्नलकडे दुर्लक्ष करणे
- नंबर प्लेटशिवाय वाहन चालवणे
सूट न मिळणारे चालान
- दारू पिऊन वाहन चालवणे
- अपघात प्रकरणे
- दुर्लक्षामुळे मृत्यू
- अल्पवयीनाकडून वाहन चालवणे
- बेकायदेशीर रेस
- गुन्ह्यात वापरलेली वाहने
- न्यायालयात प्रलंबित असलेले चालान
- इतर राज्यातील चालान
अर्ज कसा करावा?
- NALSA च्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.
- टोकन नंबर आणि अपॉइंटमेंट लेटर ईमेल किंवा मोबाईलवर मिळेल.
- सुनावणीच्या दिवशी मूळ कागदपत्रे, चालानाची माहिती आणि टोकन घेऊन किमान एक तास आधी उपस्थित राहा.
याची नोंद घ्यावी की, लोक अदालतीचा निर्णय अंतिम असतो आणि त्यावर अपील करता येत नाही.

