( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
दिनांक ९ ऑगस्ट रोजी संगमेश्वर रामपेठ येथील प्रसिद्ध अशा श्रीराम मंदिरात अखंड श्रीराम नामाचा सप्ताह करण्यात आला. यावेळी मंदिरात अद्भुत अशी विद्युत रोषणाई करण्यात येते. त्या दिवसापासून किर्तन, भजन महिला, श्री कलावती आई चे नामस्मरण तसेच रात्रो महाआरती ज्ज्ञानोबा तुकाराम म्हणत जय गो सात मंदिरात पाच प्रदक्षिणा घालत असे सात दिवस कार्यक्रम करत भक्तगण दिनांक 15 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी अष्टमीच्या वेळी सायंकाळी भक्तगण माती आणून मातीची पुतना राक्षसणीचा श्रीकृष्णाने वध केल्याची प्रतिकृती मातीची साकारून ती राम मंदिरात ठेवली जाते. हे पाहण्यासाठी असंख्य आजूबाजुच्या गावातील, तालुक्यातून तसेच जिल्हाभरातून लोकांची रांगा लागते.
यावेळी रात्री बारा वाजून 15 मिनिटांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव लहान मुलांना श्रीकृष्णाचे रूप देऊन जन्मोत्सव साजरा करून दहीहंडी लहान मुलांकडून फोड करतात, असा आनंद लहान मुले व मोठे भक्तगण घेतात. त्यावेळी टाळ्यांच्या गजरात डोळ्यांच्या गजरात फटाक्याच्या आतच बाधित श्रीकृष्णाचा जन्मदिन साजरा करण्यात येतो. तसेच दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्ट रोजी श्रीराम नाम सप्ताहाचे सांगता करत त्यावेळी हजारो श्रीरामांचे दर्शन घेऊन भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेतला.

