(पुणे)
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली. श्रावण सोमवार निमित्त कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या महिलांची गाडी घाटात खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 10 महिलांचा जागीच मृत्यू, तर 20 पेक्षा अधिक महिला जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही दुर्घटना खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील कुंडेश्वर शिव मंदिराकडे जाताना घाट परिसरात घडली. पापळवाडी येथील महिला दर्शनासाठी निघाल्या होत्या.
अपघात घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं. अपघातग्रस्त महिलांना तातडीने पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात, तसेच खेड, चाकण, भोसरी व इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. काही जखमींना गंभीर दुखापती झाल्याने त्यांच्यावर सघन उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त, मदतीची घोषणा
या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. सोशल मीडियावरून त्यांनी सहवेदना व्यक्त करत दु:खद घटनेप्रती आपली भावना व्यक्त केली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिला:
-
शोभा ज्ञानेश्वर पापळ
-
सुमन काळूराम पापळ
-
शारदा रामदास चोरगे
-
मंदा कानिफ दरेकर
-
संजीवनी कैलास दरेकर
-
मिराबाई संभाजी चोरगे
-
बायडाबाई न्यानेश्वर दरेकर
-
शकुंतला तानाजी चोरघे
(दोन महिलांची नावे अद्याप स्पष्ट नाहीत)
विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या जखमी महिलांची नावे:
पाईट ग्रामीण रुग्णालय
-
अलका शिवाजी चोरघे
-
रंजना दत्तात्रय कोळेकर
-
मालुबाई लक्ष्मण चोरघे
-
जया बाळू दरेकर
पोखरकर हॉस्पिटल, खेड
-
लता ताई करंडे
-
ऋतुराज कोतवाल
-
ऋषिकेश करंडे
-
निकिता पापळ
-
जयश्री पापळ
गावडे हॉस्पिटल
-
शकुंतला चोरगे
-
मनीषा दरेकर
शिवतीर्थ हॉस्पिटल
-
लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर
-
कलाबाई मल्हारी लोंढे
-
जनाबाई करंडे
-
फसाबाई सावंत
-
सुप्रिया लोंढे
-
निशांत लोंढे
केअर वेल हॉस्पिटल, चाकण
-
सिद्धी ज्ञानेश्वर पापळ
बांबळे हॉस्पिटल
-
कविता सारंग चोरगे
-
सुलाबाई बाळासाहेब चोरगे
-
सिद्धीकार रामदास चोरगे
-
छबाबाई निवृत्ती पापळ
साईनाथ हॉस्पिटल, भोसरी
-
सुलोचना कोळेकर
-
मंगल शरद दरेकर
-
पुनम वनाची पापळ
-
जाईबाई वनाजी पापळ
साळुंखे हॉस्पिटल, खेड
-
चित्रा शरद करंडे
-
चंद्रभागा दत्तात्रय दरेकर
-
मंदा चांगदेव पापळ
स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्कालीन सेवा यांनी एकत्र येत मदत व बचावकार्य राबवलं. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वाहनाचा ताबा सुटणे ही शक्यता वर्तवली जात आहे.
श्रद्धेच्या प्रवासात मृत्यूचं वळण
श्रावण महिन्याच्या पवित्र सोमवारी देवदर्शनासाठी निघालेल्या या महिलांच्या यात्रेला दुःखद वळण लागलं. संपूर्ण परिसरात आणि पापळवाडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

